भुसावळ प्रतिनिधी । अमळनेर येथे कोरोनाबाधीताच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावणार्या तालुक्यातील किन्ही येथील दोघांना जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची कोरोना चाचणी होणार आहे.
अमळनेर येथील मृत झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या मृताच्या अंत्यसंस्कारासाठी भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील दोन जण गेले होते. याबाबत आधी चर्चा सुरू होती. मात्र दुपारी जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केल्यानंतर या दोघांना जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांचा स्वॅब नमुना घेण्यात येऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००