सांगली (वृत्तसंस्था) एका सहावीतील मुलीवर लैंगिक अत्याचार करुन मोबाईलवर तिचे अश्लिल फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार बेडग येथे घडला आहे. याप्रकरणी लक्ष्मण कारंडे (वय 25) नावाच्या नराधमास अटक करण्यात आली आहे.
मिरज तालुक्यातील बेडग गावात एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकाकडे लॉकडाऊन असल्याने अडकून पडली आहे. पिडीत मुलगी रात्री लघुशंकेसाठी ती घराबाहेर आल्यावर लक्ष्मण कारंडे यांने तिला जबरदस्ती बेडगमधील अंगणवाडी शाळेच्या बाथरुम नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या नराधमाने मुलीचे लैंगिक शोषण करुन मोबाईलवर तिचे अश्लिल फोटोही काढले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.