शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील शेंदूर्णी उत्तरभाग विकास सोसायटीच्या ५४० पात्र सभासदांपैकी ३९८ शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली असून उर्वरीत १४२ शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
राज्य सरकारच्या महात्मा फुले थकीत कर्जमाफी योजनेसाठी ५४० सभासद पात्र ठरले आहेत. त्याची कर्ज रक्कम ३ कोटी५० लाख रुपये आहे. प्रत्यक्षात दि. ३१ मार्चपर्यंत ३९८ थकीत शेतकऱ्यांना २ कोटी ११ लाख कर्जमाफी झाली असून त्यातील ४८ शेतकऱ्यांना २४ एप्रिलपर्यंत १४ लाख रुपये नव्याने कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी उर्वरीत पात्र १४२ सभासदांना १ कोटी ३९ लाख कर्जमाफीची कोरोना मुळे प्रतीक्षा आहे. त्यांनाही लवकरच लाभ मिळणार आहे. संस्थेचे नियमितपणे कर्जफेड करणारे २२५ सभासदांना १ कोटी ५ लाख रुपये मागील हंगामात कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यातील ६७ शेतकऱ्यांनी आपल्याकडील ३७ लाख रुपयांचा कर्ज भरणा केला आहे. कर्ज भरण्यासाठी ३१ मे २०२० मुदतवाढ मिळाली असल्याने उर्वरीत शेतकरीही कर्ज मागणीसाठी पात्र ठरणार आहेत. ही माहिती संस्थेचे चेअरमन सुभाष विठोबा चौधरी, व्हाईस चेअरमन पार्वतीबाई शंकरलाल शुक्ल, जेष्ठ संचालक कडोबा सोनजी गुजर, आनंदा नारायण कोळी, सर्व संचालकासह , सेक्रेटरी राजेंद्र लहू खर्चाने यांनी दिली आहे. यासभासदांना कर्ज माफी मिळवून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे क्षेत्रिय अधिकारी आर. ए. पाटील, शाखा व्यवस्थापक माधवराव पाटील, संस्था कर्मचारी विनोद इंगळे, विकास पाटील, अशोक चौधरी यांचे सहकार्य लाभले.