यावल प्रतिनिधी । शहरातील संत रोहिदास नगरातील एका १५ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संत रोहिदास नगरात राहणारी १५ वर्षाची मुलगी ही आपल्या अंगणात मैत्रीणीशी गप्पा मारत असतांना रिहान खाटीक याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तिने याबाबत आपल्या चुलत भावाला माहिती दिली असता रिहान खाटीक याने सय्यद खाटीक, शाहरूख खाटीक, मुजाहिर खाटीक, अजगर खाटीक, अस्लम खाटीक व अन्य आठ-दहा जणांना बोलावून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

या अनुषंगाने यावल पोलीस स्थानकात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार रिहान खाटीक, सय्यद खाटीक, शाहरूख खाटीक, मुजाहिर खाटीक, अजगर खाटीक, अस्लम खाटीक व अन्य आठ-दहा जणांविरूध्द भाग-५ गुरनं ७२/२०२० भांदवि ३५४ (अ) (१) (आय); १४३; १४७; १४९; ३२३,५०६, ४२७ सह अनुसुचीत जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ७ आणि ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००


