जळगाव प्रतिनिधी । राज्यातील मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांचे वेगळेच कारण दाखविले जात असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढीस लागल्याचा आरोप माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
माजी जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आ. गिरीश महाजन यांनी सध्या सुरू असणार्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांचे वेगळेच कारण दाखविले जात असून मृतदेह परस्पर सोपविल्यामुळे बळींचा आकडा कमी दिसत असला तरी संसर्गाचा धोका वाढला आहे. आ. गिरीश महाजन यांनी आपल्या या दाव्यासोबत त्यांनी नायर रूग्णालयात मृत झालेल्या दोन रूग्णांचे उदाहरण दिले आहे. हे दोन्ही रूग्ण कोरोना संशयित म्हणून दाखल झाल्यानंतर मरण पावले. तथापि, या दोघांची स्वॅब चाचणी करण्यात आली नाही. यामुळे हे रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह होते की नाही ? याची शहानिशा न करता अंत्यसंस्कारासाठी त्यांचे मृतदेह कुटुंबियांना सोपविण्यात आले. नायर रूग्णालयातील ४४ मृतदेह याच प्रकारे आप्तांन सोपविण्यात आल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी या पत्रात केला आहे.
या पत्रात आ. महाजन पुढे म्हणतात की, इतर हॉस्पीटलमध्येही हाच प्रकार सुरू असल्याची माहिती मला मिळाली आहे. यामुळे मृत झालेल्यांना नॉन-कोविड समजून त्यांचे मृतदेह आप्तांना सोपविण्यात येत असल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या प्रकारे मृतदेह सोपविण्याची प्रथा बंद करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००