नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रकोप वाढतांना दिसत असून आता राष्ट्रपती भवनाताच कोरोनाचा रूग्ण आढळून आला असून यामुळे अवर सचिवांसह ११ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
कोरानामुळे देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू असतांनाही याचा प्रकोप वाढतांना दिसून येत आहे. यातच आता थेट राष्ट्रपती भवनातच कोरोनाने प्रवेश केल्याचे दिसून आले असून एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. यानुसार राष्ट्रपती भवनात काम करणार्या अवर सचिवाची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह असल्याची आढळून आली आहे. यामुळे संंबधीत अवर सचिवांसह ११ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या १२५ कुटुंबांना विलीकरणात राहण्यासाठी सांगण्यात आले आहे.
One COVID-19 positive case found in Rashtrapati Bhavan, 125 families advised to remain in self-isolation as mandated by the Health Ministry’s guidelines as a precautionary measure: Sources
— ANI (@ANI) April 21, 2020