Home Cities जळगाव ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये व्यवसायास परवानगी द्यावी- नाभिक महामंडळ

ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये व्यवसायास परवानगी द्यावी- नाभिक महामंडळ

0
24

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे नाभिक समाज बांधवांसमोर अनंत अडचणी येत असून प्रशासपाने ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये केश कर्तनाचा व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नाभीक महामंडळातर्फे करण्यात आली असून याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व नाभिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. नाभिक समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून व्यावसायिक व कारागीर व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत आला आहे. मात्र, उच्चपदस्थ व्यक्ती नाभिक समाज बांधवांवर दडपण आणून दाढी-कटिंग करून घेत आहेत. मात्र, यात धनदांडग्यांना सोडून गरीब नाभिक समाज बांधवांवरच गुन्हे केले जात आहेत. हा समाजावर अन्याय आहे. तरी ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये व्यवसाय सुरू करण्यास परवानगीची मागणी महाराष्ट्र नाभिक मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी नाभिक व्यावसायिकांना सुरक्षित किट, चष्मा, हॅण्ड ग्लोव्हज, ड्रेस याची सुविधा पुरवावी, ५० लाखांचा विमा उतरवावा, घर व दुकान भाडे, दीर्घ व्याज माफ करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून प्रतिमहिना पाच हजार मदत देऊन पॅकेज जाहीर करावे. अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत.

हे निवेदन देतांना किशोर सूर्यवंशी, पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र बोरनारे, राजकुमार गवळी, सुदामा कोरडे, राहुल जगताप, नारायण सोनवणे, संकेत कापसे, मनीष कुंवर, पद्माकर निकम, हिमांशू गवळी आदी समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound