फैजपूर प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. शिवाजी मगर यांनी लॉकडाऊन कालावधीचा यथायोग्य वापर करून टीवायबीएस्सीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे.
सदरील ऑनलाईन वर्गात कोल्हापूरातील राजाराम महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.सुनील सांगळे यांनी plant breeding या टॉपिक वर मार्गदर्शन झाले. त्यात त्यांनी प्लांट ब्रीडिंग बद्दल सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्याच्या शंकाचे निरसन पण केले. या ऑनलाईन वर्गामध्ये मंदार बामनोदकर, पौर्णिमा, प्रियांका, कोमल, पूर्वा, अदिती, दिव्या, सपना, जयश्री, सुयोग्य इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.