जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या वादातून चौघांनी एकाला बेदम मारहाण करून जीठे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी अशोक राजाराम झाल्टे (वय-३७) रा. पिपल्स बँकेसमोर, तुकाराम वाडी याला ‘तु जास्त मातला आहे. आमच्या विरोधात जातो’ असे बोलून संशयित आरोपी भुषण माळी, निखील वाणी, आकाश ठाकूर आणि सचिन उर्फ टिचुकल्या चौधरी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. तुकाराम वाडी यांनी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली व तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. यात अशोक झाल्टे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अशोक झाल्टे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर एमआयडीसी पोलीसात मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. रामकृष्ण पाटील करीत आहे.