Home Cities जळगाव जळगाव मनपा उपायुक्त अजित मुठे यांची बदली

जळगाव मनपा उपायुक्त अजित मुठे यांची बदली


जळगाव प्रतिनिधी । महानगरपालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांची नुकतीच बदली मीरा भाईदर येथे झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश १३ एप्रिल रोजी प्राप्त झाले असून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे असे आदेशात म्हटले आहे.

गेल्या आठ महिन्यापासून जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त म्हणून रूजू झालेले अजित मुठे यांची मीरा-भाईंदर येथे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. दोन महिन्यांपासून अतिक्रमण विभागाचे काम आले असता त्यांनी कुशलतेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली आहे. पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर त्यांनी कारवाईची मोहीम सुरू केली होती. मात्र लॉकडाऊन ही मोहीम थांबली आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशात लॉकडाऊन असतांनाही उपायुक्त मुठे यांची झालेली बदली हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. जळगाव महापालिकेत त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे त्यांना सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound