जळगाव, प्रतिनिधी । कोरोना संसर्गामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू असल्याने दैनंदिन जीवनातील रोजंदारीवर अवलंबून असलेले गोर गरीब मजूर व दवाखान्यात असलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक अशांना आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्त्वाखाली संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय संस्थेतर्फे फूड पॅकेट वाटप करण्यात येत आहे.
गोर गरीब मजूर व दवाखान्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक अश्या व्यक्तीपर्यंत अन्न वाटप पॅकेट देण्याचे कार्य संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी गणेश पाटील, प्रवीण भोई, जितेंद्र पाटील, किशोर नेवे, रवींद्र शिंदे, ज्ञानेश्वर इंगळे, आशा पाटील आदींनी कामकाज पहात आहेत.