Home क्राईम कुसुंब्यात जुगार अड्डयावर धाड

कुसुंब्यात जुगार अड्डयावर धाड

0
71

जळगाव । तालुक्यातील कुसुंबा गावात जुगार खेळणार्‍यांवर औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाच्या पथकाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे.

कुसुंबा येथे सुरेश मधुकर जोशी, आनंदा आत्माराम पाटील, अक्षय यशवंत पवार, अजय यशवंत पवार, रमेश गणेश राठोड, शुभम प्रकाशचंद्र राठी व मयुर राजेंद्र पाटील हे सात जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने छापा मारुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. या जुगारींकडून दोन हजार १५० रुपयांची रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound