रावेर शालीक महाजन । कोरोनाचा प्रकोप व यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून यापासून मुक्तता मिळण्यासाठी आज तालुक्यातील विवरा येथील एका शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे केळी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. केळीच्या वाहतुकीमध्ये अडथळे आले असून यामुळे भावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. यातच विवरा येथील एका तरूण शेतकर्याने तीन हजार खोडे लावलेली असून शेतात ५० ते ६० क्विंटल केळी पडलेली आहे. आधी हजारपेक्षा भाव असतांना आता दोनशे रूपयांपर्यंत भाव खाली आल्याने निराश झालेल्या शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात सुदैवाने हा शेतकरी वाचला असून त्याने आपली आपबिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजजवळ व्यक्त केली आहे. पहा याबाबतचा हा व्हिडीओ.