पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात एका दिवसात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 25 जणांचा बळी गेला आहे.
गुरुवारी सायंकाळपर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना ग्रस्त संख्या २०६ वर येऊन पोहोचली होती. तर, पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या १८१ इतकी आहे. पुण्यात एका दिवसात १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७ रुग्णांना इतर आजारांनीही ग्रासलेले होते. तर, अनेक मृतांचे वयोमान हे ५५ वर्षांवरील होते.