मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना लॉकडाऊनमुळे आयआरसीटीसीकडून चालविल्या जाणाऱ्या तीन गाड्यांच्या फेऱ्या ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयआरसीटीसीने या गाड्यांचे रेल्वे आरक्षण ३० एप्रिलपर्यंत रद्द केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लावले होते. त्यामुळे आयआरसीटीसीने मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस या तिन्ही रेल्वेंचे २५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंतचे सर्व बुकिंग बंद करण्यात आले होते. परंतू आयआरसीटीसीने काही दिवसांपूर्वीच या गाड्यांच्या १५ एप्रिलनंतर बुकिंग सुरु केली होती. मात्र देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. हे पाहता आयआरसीटीसीने आपल्या खासगी रेल्वेचे बुकिंग ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.