Home राज्य सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी २४ मार्चला मतदान

सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी २४ मार्चला मतदान

0
31

खामगाव प्रतिनिधी । सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

याप्रसंगी सहारिया यांनी सांगितले की, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल २०१९ मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २८ फेब्रुवारी ते ७ मार्च २०१९ या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. ३ व ४ मार्च २०१९ या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी ८ मार्च २०१९ रोजी होईल. मतदान २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत होईल. मतमोजणी २५ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound