जळगाव, प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू माहुलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना संबोधण्यासाठी थेट एका विशिष्ट राजकीय विद्यार्थी संघटनेच्या फेसबुक लाईव्ह उपयोग केला होता. या प्रकाराचा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करून याप्रकाराची तक्रार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली असता मुख्यमंत्री ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिलेल्या तक्रारीबद्दल आज एक ईमेल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना प्राप्त झाला असून त्यात मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकाराची योग्य ती चौकशी व कारवाई करण्यासाठी संबंधित विभागा ला योग्य कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे भविष्यामध्ये विद्यापीठाचे नाव बदनाम करण्याचे व दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करण्यासंबंधीचे प्रकार यांना नक्कीच आळा बसेल व प्र-कुलगुरू माहुलीकर यांची लवकरच असलेल्या पदावरून हकालपट्टी करण्यात येईल असा विश्वास खानदेशातील प्रत्येक विद्यार्थ्याला व जिल्हा व एनएसयूआयला असल्यांचे मराठे यांनी प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे कृत्य भविष्यामध्ये कोणी केल्यास त्याच्या तोंडाला जळगाव जिल्हा एनएसआय काळे फासले शिवाय राहणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिला आहे.