आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा : अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा ज्यांना स्वत:च्या प्रकृतीबद्दल संशय आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

 

कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर त्याची साखळी तोडणे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणे, संशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणे हाच प्रभावी मार्ग आहे. राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी अशा करोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे, असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Protected Content