जामनेर प्रतिनिधी । शहरातील अरफात चौकात क्षुल्लक कारणातून दोन गटात तुफान हाणामारी आज सकाळी घडली. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री संचारबंदी असल्याने शहरातील मोहल्ला भागात पोलीस वाहनातून पेट्रोलिंग करत असतांना मोहल्ल्यातील तरूण धावपळ करून एकाच्या घरासमोरून पळून जात असतांना एका घरातील महिला आणि लहान मुले खूप घाबरले. हे पाहून घरातील ज्येष्ठ व्यक्तीने शिवीगाळ करून तरूणांवर भडकले. हा प्रकार रात्री माफी मागून हा वाद मिटविला होता. पण पुन्हा याच वादातून आज सकाळी शहरातील अरफात चौकात दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत शेख जमली शेख रसुल, आबिद शेख खालीद, अजीम शेख जमील, शब्बीर शेख युनुस, शेख जलिल शेख सईद, शेख अल्ताफ शेख सईद हे सहा जखमी झाले. दरम्यान त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणल्या नंतर तेथे सुद्धा एकमेकांना हाणामारीचा प्रयत्न यांनी केल्याचा समजते. जखमींना जळगावला उपचारासाठी रवाना केले आहे. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणुन वातावरण शांत केले.