Home आरोग्य महाराष्ट्रात आतापर्यंत ५३७ करोनाग्रस्त रुग्ण !

महाराष्ट्रात आतापर्यंत ५३७ करोनाग्रस्त रुग्ण !


मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या आज ४७ ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता ५३७ करोनाग्रस्त असून शुक्रवार रात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती.

 

राज्यात कोरोनाबाधितांची ४९० वर पोहोचली आहे. मुंबईत वरळी कोळीवाडा, धारावी, पवई या ठिकाणानंतर दादरमध्येही कोरोनानेही शिरकाव केला आहे. दादर शिवाजी पार्क परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता अजून वाढली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबई आणि ठाण्यातले आहेत. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असल्याने आरोग्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिले आहेत.


Protected Content

Play sound