Home Cities रावेर रावेरात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

रावेरात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा


रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात बेकायदेशीर देशी विदेशी दारू विकणाऱ्या तिघांवर रावेर पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातील दारू व मोटारसायकल हस्तगत केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील रूस्तम चौकात सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अब्दुल सत्तार शे. गुलाब वय 57 वर्षे रा. गरीब नवाज मोहल्लातील मदरसा जवळ रावेर यांच्या मोटारसायकल क्रमांक MH 19 AG 9455 संशयित आरोपी शे. रफिक शे. कय्युम रा.गरीब नवाज मोहल्ला आणि रामचंद्र कडू तायडे रा. आसराबारी रावेर शहरातील रूस्तम चौकात देशीदारूचे दोन बॉक्स घेवून जात असतांना बेकायदेशीर दारू घेवून जात असल्याची माहिती रावेर पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत ९६ देशी दारूच्या बाटल्या ५ हजार रूपये किंमतीच्या आणि १५ हजार रूपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली. याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन आणि विना परवाना देशी विदेशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पो.कॉ. महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सतिष सानप नेम करीत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound