जामनेर, प्रतिनिधी । राज्य सरकारने रेशनिंग दुकानात एप्रिलमध्ये वाटप करायचे नियमित धान्य १ तारखेपासून उपलब्ध करून दिले आहे व केंद्र सरकार कडून लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळाचे वाटप, रेशनिंग दुकानातून १० एप्रिलनंतर चालू करण्यात येणार आहे तशी सूचना जामनेर तालुका तहसील मधील पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
सर्व शिधापत्रिकाधारकांना कळविण्यात येत आहे की, आता फक्त एप्रिल महिन्याचे नियमित धान्य वाटप करण्यात येईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वाटप करावयाचे मोफत धान्य, अंतोदय व प्राधान्य लाभार्थी यांना दहा एप्रिल नंतर पाच किलो तांदूळ प्रति व्यक्ती वाटप करण्यात येईल.म्हणून रेशन दुकानासमोर सोशियल डिस्टन्स पाळून धान्य खरेदी करावी विनाकारण रेशन दुकाना समोर गर्दी करू नये.असे आवाहन करण्यात आले आहे.