पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । येथे कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रामनवमीनिमित्त सायंकाळी प्रत्येकाने घरासमोर नऊ दिवे लावून कोरोना वर मात करण्यासाठी प्रभूरामचंद्र यांना पहूर येथील नागरिकांनी साकडे घातले.
रामनवमीनिमित्त पहूर येथे सायंकाळी सात वाजता आपल्याला घरासमोर, कंपाऊंडवर प्रत्येकाने नऊ दिवे लावून संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून यातूनच सुखरूप बाहेर पडण्यासाठी प्राथर्ना केली. आपल्या सर्वांच्या जीवनासाठी धडपडत असलेल्या डाँक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता दूत, आणि पोलीस यंत्रणा, ,कोरोना व्हायरस या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या या सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी रामनवमीनिमित्त प्रभूरामचंद्र यांना साकडे घालण्यात आले.