जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील १३ जणांना दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचा थेट निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या झालेल्या कार्यक्रमाशी संबंध जोडण्यात येत होता. परंतू या १३ लोकांचे ‘निजामुद्दीन कनेक्शन’ अद्याप सिद्ध झालेले नाही. विशेष म्हणजे यातील ७ जण हे गैरमुस्लीम असल्याचे देखील कळतेय. त्यामुळे त्यांचा ‘मरकज’शी दुरान्वये संबंध नसल्याचे तूर्त तरी दिसून येत आहे.
दिल्लीतल्या निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहणार्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात तबलिगी जमातीच्या या कार्यक्रमात १३ जण उपस्थित होते अशी माहिती समोर आली होती. परंतू परंतू या १३ लोकांचे ‘निजामुद्दीन कनेक्शन’ अद्याप सिद्ध झालेले नाही. कारण यांनी फक्त दिल्ली प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.
या १३ जणांमध्ये जळगाव तालुका २, भुसावळ तालुका ३, यावल तालुका ३,एरंडोल तालुका, पाचोरा तालुका, अमळनेर तालुका,धरणगाव तालुका,चाळीसगाव तालुका,चोपडा तालुका प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, म्हणजे यातील ७ जण हे गैरमुस्लीम असल्यामुळे त्यांचा ‘मरकज’शी दुरान्वये संबंध तूर्त तरी दिसून येत नाहीय. तर उर्वरित मुस्लीम बांधव देखील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रशासन लवकरच याबाबत अधिकृत खुलासा करण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००