Home आरोग्य अमेरिकेत कोरोनामुळे एक दिवसांत तब्बल ८८४ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनामुळे एक दिवसांत तब्बल ८८४ जणांचा मृत्यू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेत कोरोनामुळे एक दिवसांत तब्बल ८८४ नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड भीतीचे वातवरण पसरलेले आहे. दरम्यान, अमिरिकेत मृतांची संख्या आता पाच हजारच्या पुढे गेली आहे.

 

जॉन हॉपकिन्स विद्यापीठात कोरोना व्हायरस रिसोर्स केंद्त्रात मागील २४ तासात ८८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत झालेल्या मृत्यूचा हा सर्वोच्च आकडा आहे. तर प्रत्येक अडीच ते सहा मिनिटांच्या कालावधीत अमेरिकेत एक मृत्यू होत आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या चीन, इटली आणि स्पेन या देशांपेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील लोकांनी पुढील दोन आठवड्यात स्थिती आणखी बिघडणार असल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ९० हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, अमेरिकेत मृतदेहांवर अंतिम संस्कार करणे देखील धोकादायक बनले आहे.


Protected Content

Play sound