घाबरू नका : चोपड्यातील ‘त्या’ मृत रूग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या संशयातून जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत झालेल्या रूग्णाचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

याबाबत वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी एक रूग्ण कोरोना संसर्गाची लागण झाल्याच्या संशयातून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. त्या रूग्णावर उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या मृत रूग्णाच्या कोरोना चाचणीच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा निगेटीव्ह असल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले. यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या रूग्णाच्या आप्तांसह त्याच्या संपर्कात आलेल्या २३ जणांचा रिपोर्ट कालच निगेटीव्ह आला होता. यानंतर कोरोनाचा संशयित असणार्‍या रूग्णाचा चाचणी अहवालदेखील निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांवरील तणाव दुर झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content