Home आरोग्य हुश्श….फैजपूरचा तो रूग्ण घरी परतला

हुश्श….फैजपूरचा तो रूग्ण घरी परतला

0
80

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या संशयातून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलेला रूग्ण आज घरी परतल्याने फैजपुरकरांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री ११ वाजेच्या दरम्यान शहरातील एका कोरोना संशयिताला मुक्ताईनगर च्या रुग्णवाहिकेतून जळगांव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून ताप सर्दी खोकला त्याला होता. रात्री श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने लागलीच जळगाव येथे हलवण्यात आले होते. रुग्णालयात रात्री अतिदक्षता विभागात दोन तास ठेवण्यात आले त्याला खोकला कोणत्या प्रकारे येतो याची चौकशी डॉक्टरांनी केली त्या रुग्णाला कोरोनाचे कुठलेही लक्षणे दिसून न आल्याने त्या रुग्णाला सकाळी औषध उपचार करून घरी पाठवण्यात आले. मात्र या रुग्णाला घरी राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यामुळे फैजपूरकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound