नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निजामुद्दीन येथील तबलीगी जमातच्या मरकजनंतर आता लखनौमधील एका मस्जीदमध्ये १३ विदेशी मुस्लीम नागरिकांना पोलिसांनी छापेमारी करून ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस आयक्त आणि पोलीस अधिक्षकांनी छापा टाकू १३ विदेशी नागिरकांना मस्जीदमधून बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे १३ मार्चपासून हे लोक मस्जीदमध्ये लपून बसले होते, असे सांगण्यात येत आहे. या विदेशी नागरिकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. त्यानंतर, सर्वांनाच आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या विदेशी नागरिकांची संख्या ६ असून ते कझाकिस्तान येथून भारतात आले आहेत. तर, मडियांव प्रभागातील रॅलीत सहभागी झालेले ७ मुस्लीम नागरिकही येथे आढळून आले आहेत. हे सर्व बांग्लादेशी नागरिक असून लखनौ मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रशासनाने सर्वाना ताब्यात घेतले आहे.