Home Cities एरंडोल कासोदा येथे नामदार शाह फाउंडेशनतर्फे धान्य वितरण

कासोदा येथे नामदार शाह फाउंडेशनतर्फे धान्य वितरण


कासोदा प्रतिनिधी । येथील नामदार शहा फाऊंडेशनतर्फे सय्यद मोहल्ल्यातील गरीब, विधवा महिला, निराधार अपंग व गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्याचे आले.

याबाबत माहिती अशी की, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले असल्याने कासोदा येथील नामदार शहा फाउंडेशनतर्फे सय्यद मोहल्ल्यातील गरीब, विधवा महिला, निराधार, अपंग या गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने गरजूंना मदत करणे गरजेचे आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून नामदार शाह फाउंडेशनतर्फे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक मोहल्ल्यात असा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जुनेद सय्यद जावेद खान वसीम शेख मोइन अली सद्दाम अली यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound