Home धर्म-समाज पारोळा येथे चिमुकल्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत

पारोळा येथे चिमुकल्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत


पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील जोगलखेडा येथील मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक किशोर पाटील यांच्या ८ वर्षाच्या मुलगा मेहुलने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अल्पबचतीतून मदत केली.

जोगलखेडा येथील आठ वर्षाचा मुलगा मेहूल याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात मोदींजीनी कोरोना या महामारी संकंटापासून भारतातील कोरोना बाधीत झालेल्या गरजू रुग्णांना मदत व्हावी म्हणून केलेल्या आवाहनामुळे प्रेरित होऊन आपल्या अल्प बचतीतून गल्ला मुख्यमंत्री सहायत्तानिधीत पैसे जमा करण्यासाठी थेट पारोळा पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांच्याकडे जमा केले. वडील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अहोरात्र काम करत असताना मुलाची संवेदनशीलता पाहून निश्चितच बाप से बेटा सवाई म्हणावे लागेल. मेहूलने दाखविलेल्या कार्याबद्दल तालुक्यात सामाजिक, राजकीय, क्रीडा, व्यापारी, शेतकरी संघटना, मराठा सेवा संघटना, नोकरी गोरगरीब जनतेकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound