जळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शंकरराव नगरात राहणाऱ्या 52 वर्षीय प्रौढाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आले

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश डाणू सावदेकर (वय-५२) रा.शंकरराव नगर, डीएनसी कॉलेज जवळ हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते एमआयडीसीतील चॉकलेट कंपनीत कामाला आहे. आज सकाळी ते कामावर जात होते मात्र अर्ध्या रस्त्यातून ते घरी परत आले. त्यांची दुमजली घर आहे, लहान भाऊ किशोर सावदेकर खाली रहतात तर गिरीश सावदेकर हे वरच्या मजल्यावर राहतात. पत्नी योगिता ह्या खालच्या घरात दिरानी सोबत पापड करण्यात मग्न होत्या. वरच्या मजल्यावर कोणीही नसतांना त्यांनी आतल्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लहान भाऊ किशोर हे वर गेल्यावर 10.30 वाजेच्या सुमारास लक्षात आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी योगिता, मुलगी मृणालिनी, मुलगा भावेश, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.

Protected Content