कोरोना : मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात ; ५ जणांचा मृत्यू

हैदराबाद (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. काम नसल्याने मजूर गावी परत जात आहेत. तेलंगणातील शमशाबादमध्ये अशाच पद्धतीने घरी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात ५ मजूर ठार झाले आहेत.

 

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास ३० मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला. तेलंगणातील शमशाबाद येथे मिनी ट्रक आणि लॉरीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Protected Content