फैजपूरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तरूणावर गुन्हा

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असतांना सुद्धा शहरात विनाकारण घराच्या बाहेर पडल्याने शहरातील ३३ वर्षीय तरूणावर कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सद्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. असे असतांना प्रितम रमेश दूधाणी (वय 33) रा दक्षिण बाहेर पेठ हा आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य आजारापासून संरक्षण होण्याकरिता जमावबंदी आदेशानंव्ये कार्य बजावत असतांना पोहेकॉ विष्णू पोहेकर यांच्याशी हुज्जत घातली व सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून शांततेचा भंग केल्याने पो.कॉ. विष्णू पोहेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content