संचारबंदी : माजी सैनिकाने पोलीस मित्र म्हणून सेवा देण्याची व्यक्त केली इच्छा

 

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । येथील रहिवासी एरंडोल डेपोतील वाहतूक निरीक्षक गोविंदा धोंडू बागुल यांनी कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांना लेखी निवेदन देऊन त्यांना संचारबंदीच्या काळात पोलीस मित्र म्हणून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील ३ दिवसापासून देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉक डाउनच्या काळात पोलिसांवरील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. यागोष्टीची दखल घेत माजी सैनिक गोविंदा धोंडू बागुल यांनी कासोदा पोलिसांकडे पोलीस मित्र म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी निवेदनात कासोदा पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे मी स्वतःहा माजी सैनिक असून मी आपल्या सोबत संचारबंदीत पोलीस मित्र म्हणून काम करण्यासाठी इच्छुक आहे. मला सर्व शस्त्रांन बाबतीत माहिती आहे. मी आपल्या सोबत देश सेवा करू इच्छित आहे असे नमूद केले आहे . गोविंदा धोंडू बागुल यांनी सामाजिक भान जपत थेट पोलिसांकडे आपल्या सैन्यातील अनुभवाचा उपयोग करून देशांतर्गत शांतता प्रस्थापीत करण्यात मदत देऊ केल्याने कासोद्यात सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

Protected Content