सावद्यात पोलीस, पत्रकार व नगरपालिकेतर्फे भाजीपाला विक्रेत्यांची बैठक व्यवस्था

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर भाजीपाला बाजारात गर्दी होऊ नये यासाठी येथे पोलीस प्रशासन, पत्रकार आणि नगरपालिकेने पुढाकार घेऊन विक्रेते आणि ग्राहकांसाठी आखणी केली आहे.

येथील पत्रकार ,नगरपालिका यांचे सह पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रमुख मार्गावर तसेंच प्रमुख चौक चौकात ठिक-ठिकाणी भाजीपाला विक्रेते आणि खरेदीसाठी येणार्‍या ग्राहक यांना उभे राहण्या साठी आखणी करण्यात आली आहे. ग्राहकाची गर्दी होऊ देवु नका, ग्राहकाला चढ्या भावाने माल न देता योग्य भावात विक्री करूनच द्यावा, अश्या सूचना पालिके तर्फे करण्यात आल्या आहेत. या बाबत तक्रारी आल्यास कार्यवाही करण्यात येईल अश्या सूचना देण्यात आल्या आहे. ज्या ठिकाणी आखणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीत्यांनी आपली दुकाने लावावी. असे सूचित करण्यात आले आहे.जो पर्यंत आठवडे बाजाराच्या बंद ठेवण्यात येणार आहे तो पर्यंत भाजी पाला विक्रेते व शेतीमाल,ग्राहक याच्या गैरसोय होऊ नये त्याच्या सोई करिता तसेच एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये या साठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

याच्या अंतर्गत भाजीपाला घेताना आखणी केलेल्या चौकतातच लांबूनच उभे राहावे लागणार आहे. संबंधीत आखणी ही ऑइल पेंट पांढर्‍या रंगाने करण्यात आली आहे. यात गांधी चौक येथे तीन गवत बाजार येथे दोन रविवार पेठ ते एक सोमवारगिरी मढी जवळ २ दुकाने, महावीर चौकात २, इंदिरा गांधी चौकात २,गवत बाजारात २, महावीर चौकात २, खाजा नगर येथे तीन अशी भाजीपाला विक्री त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी याच ठिकाणी बसावे व गर्दी करू नये असे आवाहन मुख्य अधिकारी सौरभ जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पत्रकार संघ यांनी केले आहे. या बैठकीप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी आरोग्य अधिकारी महेश चौधरी, मनोज चौधरी, भागवत घुंगले, राजू मोरे यांचेसह कर्मचारी व पत्रकार सदस्य श्याम पाटील, लाला कोष्टी, आत्माराम तायडे, राजीव दीपके, दीपक श्रावगे व प्रवीण पाटील उपस्थित होते.

Protected Content