भुसावळात पाच ठिकाणी भरला बाजार !

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने निर्देश दिल्यानुसार आज सकाळपासून पाच ठिकाणी भाजी बाजार भरला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील संचारबंदी सकाळी ६ ते १० या वेळेत शिथिल केली जात असून या कालावधीत लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असतात. यातच भाजी बाजारात एकच गर्दी उसळते. कोरोनाच्या प्रतिकारासाठी गर्दी टाळणे हा सर्वात महत्वाचा उपाय असल्यामुळे एकाच ठिकाणी भाजी बाजाराऐवजी शहरात पाच ठिकाणी भाजीबाजार भरवण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांनी घेतला आहे. यात शहरातील मुख्य भाजीबाजारासोबतच खडका रोड, पालिका शाळा क्रमांक तीन, जळगाव रोडवरील पालिकेच्या शाळेचे मैदान, गडकरीनगर, टीव्ही टॉवर मैदान येथे भाजीबाजार भरविण्यात येणार आहे. संचारबंदी शिथिल असताना सकाळी ७ ते १० या वेळेत नागरिकांना याठिकाणी भाजीपाला खरेदी करता येणार असल्याने जनतेची सोय होणार आहे.

Protected Content