कोरोना इफेक्ट: जामठीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामस्थांनी केली गावबंदी

बोदवड प्रतिनिधी । जामठी येथे गावाच्या बाहेर असलेल्या सिमारेषेवर नागरिकांनी दोर बांधून तसेच नाकाबंदी दंडा लावला आले आहे. तर ग्रामपंचायतीचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना सहजासहजी गावात प्रवेश मिळू शकत नाही.

जामठी गावामध्ये जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून गावात जाताना आपले नाव नोंदवून घेण्यास बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या व्यक्तींना विचारूनच आत प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे एखादा संशयित रुग्ण सहजासहजी गावात जाऊ शकत नाही. जामठी गावाचा आदर्श जर प्रत्येक गावाने घेतला तर कोरोनाशी आपण सहज सामना करू शकतो.

सुरुवातीला देशाच्या काही भागात पसरलेल्या कोरोनाने आता सगळीकडे थैमान घातले आहे. त्यामुळे आता अगदी गाव-गावात देखील बाहेरली येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. एवढंच नव्हे तर अधिकची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय, देशांतर्गंत विमान सेवा देखील बंद केली आहे. तसंच बस, रेल्वे यासारख्या दळणवळणाची साधने देखील सरकारने बंद करण्याचा मोठा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. दुसरीकडे जिल्हा-जिल्ह्यातील सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कर्फ्यू लावून लोकांना घराच्या बाहेर येऊ नये असे आवाहन देखील सरकारने केले आहे. यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी तपासणी करून येण्यास सांगितले जात आहे.

Protected Content