IMG 20200325 WA0066
Agri Trends, एरंडोल, सामाजिक

कासोद्यात अवकाळी पावसाची लावली हजेरी; शेतकरी चिंतेत

शेअर करा !

कासोदा प्रतिनिधी ।  कासोदा शहरासह  तालुक्यात परिसरात आज २४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहून पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे.  या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे.

spot sanction insta

या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कापणीवर आलेला गहू , मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असून शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यामध्ये वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत जिल्ह्णामध्ये कडक ऊन होते. सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला. कासोदा शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. थंड वारे वाहू लागले. कासोदा शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ असून शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे.