शहरी बेघर निवारा गृहाच्यावतीने गरजूंना भोजन वितरण

 

जळगाव, प्रतिनिधी । देशासह जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जिल्हा रुग्णालय व अन्य रुग्णालयात पेशंट सोबत दाखल असलेल्या नातेवाईकांची गैरसोय होत असल्याने केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित शहरी बेघर निवारा गृह व देवीचंद छोरीया यांच्या सहकार्याने फूड पॉकिटचे वितरण करण्यात आले.

आज १३५ गरजूंना केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित शहरी बेघर निवारा गृह व देवीचंद छोरीया यांच्या सहकार्याने पोळी, भाजी व शिरा चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाकरिता बेघर निवारा गृहचे प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली ३ जणाची टीम तयार करण्यात आली होती. या टीमने वैद्यकिय महाविद्यालय, बसस्थानक परिसर, विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन फुड पॅकेटचे वितरण केले.

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

केशवस्मृती सेवासंस्था समूहाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जळगाव शहरातील विविध विभागात ध्वनिफीतच्या आधारे लोकांना आवाहन करायला सुरुवात केली आहे. आवश्यकता असल्यासच बाहेर पडा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Protected Content