farkande news online
एरंडोल, क्राईम

फरकांडे येथील सर्पदंशाने तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

शेअर करा !

कासोदा प्रतिनिधी । तालुक्यातील फरकांडे येथील २६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी कासोदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

spot sanction insta

याबाबत माहिती अशी की, फरकांडे येथील हितेश सुभाष पाटील (वय-२६) हा दररोज रात्री फरकांडे शिवारातील आपल्या स्वतःच्या शेतात भुईमुगांच्या पिकांला पाणी भरण्यासाठी जात होता. तसेच मंगळवारी रोजी शेतात इलेक्‍ट्रिक मोटार सुरू करून पाणी भरत होता. परंतु वीजपुरवठा खंडित व सुरू होत असल्याने रोजच्या वेळेपेक्षा बराच वेळ होवून देखील हितेश उशिरापर्यंत न आल्याने त्याचा मोठा भाऊ प्रविण पाटील यांनी शेताकडे धाव घेतली. शेतात पाहिले असता. हितेश खाली मृतावस्थेत पडलेला आढळून आला.

हितेशला डाव्या हाताच्या बोटावर सर्पदंश झाल्याचे आढळून आल्याने. मृतदेह कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख व डॉ. चेतन वाघ यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत भाऊ प्रविण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भागवत पाटील हे करित आहे. हितेश याच्या पश्चात आईवडील, दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. हितेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.