दिल्लीतल्या दुकानदार आणि भाजीपाला विकणाऱ्यांना मिळणार ई-पास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या दुकानदार आणि भाजीपाला विकणाऱ्यांना ई-पास देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना मागणी नुसार घरोघरी सामान पोहोचवले जाणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. रात्री सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांबाहेर गर्दी पाहायला मिळाली. किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्याने, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचे चित्र होते. पुढील वीस दिवसात अशी गर्दी होऊ नये म्हणून दिल्लीतल्या केजरीवाल सरकारने तोडगा काढला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या दुकानदार आणि भाजीपाला विकणाऱ्यांना ई-पास देण्याची घोषणा केली आहे. लोकांनी घरातच थांबावे आणि दुकानांबाहेर गर्दी करू नये. तसेच लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने बंद करण्यात येणार नाहीत. मी जनतेला पुन्हा सांगू इच्छितो की, घाबरून सामान खरेदी करू नका. अत्यावश्यक सामानाचा कोणताही तुटवडा नाही. अत्यावश्यक सामान विक्रेत्यांना ई-पास देण्यात येणार आहे. दरम्यान, भारतात कोरोनाचे रुग्ण ५६०च्या वर गेले असून, आतापर्यंत या जीवघेण्या रोगाने ११ जण दगावलेले आहेत.

Protected Content