THAKRE
आरोग्य, राजकीय, राज्य

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत : उद्धव ठाकरे

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना संकटाकडे सकारात्मक पाहा. कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंची काळजी करू नका. कारण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

spot sanction insta

 

सोशल मीडियावरून त्यांनी राज्यातील जनतेला उद्देशून संदेश दिला. घरांमध्ये लोक एकत्र आले आहेत. घरातले एसी बंद करा, घरातल्या खिडक्या दरवाजे उघडा असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. काल काहीशी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही, तर दुपारी आलो असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत याचा उद्धव ठाकरेंनी पुनरुच्चार केला. तसेच करोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर पाऊल आपण टाकले तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल, हे विसरु नका. या करोनाला हरवण्याा संकल्प करा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.