daru
आरोग्य, क्राईम, धरणगाव

कोरोना : धरणगावात अवैध दारूचा महापूर !

शेअर करा !

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. यामुळे शहरातील काही भागात अवैध दारू विक्रीला महापूर आला आहे. प्रशासनाला कळवून देखील कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी थेट ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या कार्यालयात फोन करून व्यथा सांगितल्या.

spot sanction insta

 

या संदर्भात अधिक असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता शासनाने सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे धरणगावात अवैध दारू विक्रीला जणू महापूरच आलेला आहे. शहरातील मरिमाता मंदिर, संजय नगर, गौतम नगर, आनोरे रोडवरील पाटचारी,चोपडा रोड यासह विविध भागात सर्रास दारू विक्री सुरु आहे. दरम्यान, काल रात्री काही नागरिकांनी पोलीस स्थानकात फोन केले. परंतू कारवाई झाली नसल्याचेही नागरिकांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना सांगितले.  विशेष म्हणजे मूळ किंमतीपेक्षा दारू कमी भावात विकली जात असल्यामुळे ती बनावट असल्याचे स्पष्ट आहे. भविष्यात यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.