कोरोना: पहूर येथे दोन संशयित रूग्णालयात दाखल; १३१ जणांची तपासणी

पहूर प्रतिनिधी । सुरत येथून पहूर येथे मामाकडे आलेल्या चिमुकल्यासह तरूणाला ग्रामीण रूग्णालयात तपासणी दरम्यान कोरोना विषाणूशी साम्य असलेले लक्षणे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात चिमुरड्याला हलविण्यात आले.

वैद्यकीय चाचणीनंतर या बाळाचे निदान समोर येईल असे डाँक्टरांनी सांगितले आहे. तसेच शिर्डी येथून आलेल्या १४ वर्षीय तरूणाचे कोरोना विषाणूशी साम्य असलेले लक्षणे वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाणवल्याने त्यास ही जिल्हा सामान्य रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

पहूर कसबे येथील कोळीवाडा भागात गेल्या आठवड्यात शुक्रवारी सुरत येथून आजी सोबत सुरत येथून तीन वर्षाचा चिमुरडा मामाकडे आला.त्याची वडिलांची आई त्याची आजी त्याला मामांकडे सोडून शेंदूर्णी ला गेल्या. यानंतर या चिमुरड्याला तीन दिवसांपासून त्रास होत असल्याने मामा व त्याच्या त्याची आजी त्याला तपासणी साठी पहूर रुग्णालयात घेऊन आले.यादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यात डॉक्टरांना शंका आल्याने दोन वेळेस तपासणी केली. लक्षणे साम्य असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांना जाणवले. त्यामुळे चिमुरड्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना सांगितले. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयात बाळाला हलविण्यात .आले मात्र त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात नेल्यानंतर त्या रूग्णालयात दाखल करून न घेता. त्यास उद्या घेऊन या त्याच्या वर उद्या तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः ची व परीवाराची काळजी घ्यावी असे आवाहन रूग्णालया कडून करण्यात येत आहे.

बाळाला तपासणी दरम्यान लक्षणे साम्य जाणवले म्हणून खबरदारीसाठी बाळाला पुढील उपचार व वैद्यकीय चाचणी साठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले आहे. याबाबत आजतरी काही सांगता येणार नाही. वैद्यकीय अहवालावरून निदान स्पष्ट होईल. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान दुसरा चौदावर्षीय युवकाचे संशयित लक्षणे पहूर येथील महेश छाजेड नगरातील चौदावर्षीय युवक शिर्डी येथे शिक्षणासाठी असून तो रेल्वे ने दि १८ रोजी पहूर येथे घरी आला. त्यास दुसऱ्या दिवसापासून त्रास जाणवायला लागला.खाजगी उपचार घेतले परंतू फारसा फरक न पडल्याने बुधावारी संध्याकाळी ग्रामीण रूग्णालयात तपासणी केली. यादरम्यान त्याची लक्षणे संशयास्पद जाणवली असून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकार्यांनी दिला आहे. अशी माहिती रूग्णालयाकडून मिळाली आहे. दरम्यान आज पुणे, मुंबई, हैदराबाद, जालना, बंगलोर, शिर्डी येथून पहूर मध्ये आलेल्या तब्बल 131 जणांची तपासणी पहूर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Protected Content