पारोळ्यात पोलीसांनी टवाळखोरांना दिला प्रसाद ( व्हिडीओ )

पारोळा विकास चौधरी । आज संचार बंदीचे उल्लंघन करणार्‍यांना पोलीसांनी चांगलाच प्रसाद दिला. तर पोलिसांनी दुकाने बंद करून संचारबंदीचे पालन करण्याचे निर्देश दिले.

कोरोना या घातक विषाणू आजारामुळे अनेक नागरिकांचे बळी गेले असून या करोना विषाणू च्या अत्यंत घातक आजाराचे प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. या अनुषंगाने पारोळा शहरासह तालुक्यात जमाबंदी च्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात विनाकारण नागरिक बिनधास्त फिरत असताना दिसून येत होते. यामुळे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व उपनिरीक्षक बागुल व दातीर आणि पारोळा नगरपालिकेचे अधिकारी मुंडे व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी व त्यांच्या पोलिस कर्मचार्‍यांनी शहरात आज सकाळी व सायंकाळी गस्त घालून विनाकारण फिरणार्‍यांना चांगला चोप दिला. आज सकाळपासूनच पोलीस निरीक्षक लीलाधर कानाडे हे आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह शहरातील महाराणा प्रताप चौक ते नगरपालिका व भाजी मंडी कजगाव नाका एक नंबर शाळा भवानी चौक, राम चौक, शनि मंदिर चौक, मोठा महादेव चौक, रोज चौक, टेलिफोन अ‍ॅक्शन नाका, गोहाड चौक, बस स्थानक परिसर या परिसरात गस्त घालून विनाकारण दुचाकी वाहने घेऊन बाहेर फिरणार्‍याना चांगला चोप दिला. नागरिकांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

पहा : पोलीसी कारवाईचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/200857607875409/

Protected Content