General Elections 20198 768x432 1
धुळे, राजकीय

कोरोना : धुळे विधान परिषद उर्वरित निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली !

शेअर करा !

 

धुळे (प्रतिनिधी) विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी होणारी उर्वरित निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

spot sanction insta

 

येत्या 30 मार्च 2020 रोजी विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदान घेण्यात येणार होते तसेच 1 एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. परंतू कोरोना विषाणूच्या संसंर्गाचा प्रसार लक्षात घेता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत भारत निवडणूक आयोगाला विनंती केली होती.

 

केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे सेवा स्थगित केली आहे व 23 मार्च मध्यरात्रीपासून विमानसेवा स्थगित केली आहे. राज्य सरकारने देखील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक वाहतूकीवर प्रतिबंध घातले आहेत. विषाणूचा संसंर्ग रोखण्यासाठी गर्दीची शक्यता टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आयोगाने उर्वरित निवडणूक प्रक्रिया 60 दिवस पुढे ढकलण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या सुधारित तारखा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर करण्यात येतील, असे अधिसूचनेत नमूद केले असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.