anil deshmukh
क्राईम, राजकीय, राज्य

कोरोना : आता सीमा संपली, आदेश न मानणाऱ्यांना काठीचा हिसका दाखवा : गृहमंत्री

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) आता आमची सीमा संपली आहे. आम्ही मागील ८ दिवसांपासून वारंवार विनंती करतो आहे. त्यामुळे आता जे कोणी शासनाच्या सूचनांप्रमाणे सहकार्य करत नाहीत, त्यांना आपल्या काठीचा हिसका दाखवा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

spot sanction insta

 

कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि जमावबंदी लागू करुनही न ऐकणाऱ्यांवर आता थेट पोलिसी स्टाईलने कारवाई होणार आहे. अनिल देशमुख म्हणाले, सरकारच्या सूचना उच्च शिक्षित लोकही पाळत नाहीय. त्यांनाही याचे गांभीर्य कळत नाही याचे दुःख आहे. ज्यांचे शिक्षण नाही त्यांचे थोडे समजू शकतो, मात्र जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यातील अनेक लोक सहकार्य करत नाहीत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे शिकलेला असो अथवा नसो त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल. पोलिसांना जी कारवाई करायची आहे त्याची त्यांना पूर्ण परवानगी दिली, असेही अनिल देशमुख यांनी नमूद केले आहे.