मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. ६४ वर्षीय वृद्धाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती यूएईवरून मुंबईत आली होती.
महाराष्ट्रात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगभरात या विषाणूमुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारतातील अनेक राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. ट्रेन, बस सेवा, मेट्रो सेवा, दुकाने ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला. पण लोकं या निर्णयाचे तीन तेरा वाजवताना दिसत आहे. अद्याप नागरिकांना या कोरोनाची दाहकता लक्षात येत नाही, ही खंत सगळ्यांकडूनच व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत देशभरात दहा जणांचा बळी गेला आहे.