police 1
क्राईम, धुळे

धुळ्यात मध्यरात्री पोलिसाला मारहाण ; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेअर करा !

धुळे (प्रतिनिधी) शहरातील देवपुरातील अंदरवाली मशीद परिसरात मध्यरात्री एका टोळक्याने पोलिसावर हल्ला चढवीत मारहाण केल्याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot sanction insta

 

मध्यरात्री देवपूर पोलिस ठाण्याचे एक पथक गस्तीवर होते. इमाम अहमद रजा चौकात पोलिस पथक पोहोचल्यावर त्यांना चौकात काही तरुण बसले दिसले. म्हणून पोलिसांनी त्या टोळक्याला मध्यरात्र झाली आहे. आता घरी जा, असे सांगितले. याच राग आल्यामुळे हबीब ऊर्फ बनैर अय्युब खान, रिझवान खान अफझल खान पठाण, अरबाज युनूस शेख, हमीद यांच्यासह सुमारे सहा ते सात जणांचे टोळक्याने पोलिस कर्मचारी प्रकाश शंकर थोरात यांची कॉलर धरली तर पोलिस कर्मचारी वंजारी यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे कलमान्वये २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.