नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन केले असले तरी लोक याला गांभिर्याने घेत नसल्याबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका ट्विटच्या माध्यमातून नागरिकांच्या बेफिकिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. यात ते म्हणतात की, लॉकडॉऊनला लोक गांभिर्याने घेत नाहीत. कृपया आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला या विषाणूपासून वाचवा. या संदर्भातील नियमांचे गांभिर्याने पालन करा. राज्य सरकारांनी नियमांच्या पालनांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही मोदींनी नमूद केले आहे.
लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता से पालन करें। राज्य सरकारों से मेरा अनुरोध है कि वो नियमों और कानूनों का पालन करवाएं।
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020